👉निर्णय
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर निश्चित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्तीं व्यतिरिक्त राज्य शासनाने दि. 30/01/2014 च्या निर्णयानुसार अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे निश्चित केले आहे. (Nuksaan bharpaai 2024)दि. 22/06/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे.
दि.01/01/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर, 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी साठी 02/ ऐवजी 03/ हेक्टरपर्यंतमदत देण्याची निश्चित करण्यात आले आहे. (Farmers scheme)