Ration card (NFSA)केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातील बहुतांश योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी आहेत. केंद्र सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशन पुरवते. मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे. या आधी सरकारकडून रेशन कार्डधारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होतं. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ मिळणार नाही. मोफत तांदळाऐवजी आता सरकार इतर 9 जीवनावश्यक गोष्टी देणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात या योजनेचे महत्त्व अधिकच स्पष्ट झाले, जेव्हा सरकारने खाद्यतेल, गहू, तांदूळ आणि मीठासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण या माध्यमातून केले.
रेशन कार्डवर आता या गोष्टी मिळणार
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे.
रेशन कार्ड कसे काढणार?
जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील अर्ज डाउनलोड करू शकता.
तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत जोडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील.
रेशन कार्ड मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
आधार कार्डशी लिंक केलेले पॅन कार्ड
तीन पासपोर्ट साइज फोटो
आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या छायांकित प्रती
वाहन चालक परवाना
मतदार ओळखपत्र
सध्याचा मोबाईल नंबर
वीज बिल
बँक पासबुक
उत्पन्न प्रमाणपत्र
ऑनलाइन नाव तपासणी प्रक्रिया
रेशन कार्ड यादीत आपले नाव तपासण्यासाठी खालील प्रक्रिया:
https://nfsa.gov.in/state/mh या अधिकृत वेबसाइटला भेट
राज्य निवड
जिल्हा निवड
ब्लॉक आणि ग्रामपंचायत निवड
रेशन दुकान निवड
यादीत नाव तपासणी